मुख्यपृष्ठ

गांधीजींचा वर्धा जिल्हा

सेवाग्रामची प्रार्थना ,पौणारची यात्रा, आष्टीची स्वातंत्र्याची चळवळ ,हा देखावा नसून वर्धा जिल्हाच्या आत मध्यें वसणारा आत्मा आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये बाकी जिल्ह्यांच्या तुलनेत वर्धा जिल्हा जरी लहान असला तरी त्याची प्रसिद्धी आणि कीर्ती हि महान आहे. .

१८६२ पर्यंत वर्धा जिल्हा हा नागपूर जिल्हयाचा भाग होता .नंतर त्याला सुविधाजनक प्रशासकीय हाताळणीसाठी नागपूर जिल्हया पासून वेगळा करण्यात आला आणि पुलगाव जवळील कवठा येथे प्रशासकीय जिल्हा हेड क़्वार्तर बनविण्यात आले. १८६६ मध्ये जिल्हा हेड क़्वार्तर तेथून हलविण्यात आले आणि पालकवाडी नामक गावी प्रस्थापित करण्यात आले. आणि सध्या तिथेच प्रस्तापित आहे. आणि तेच नंतर वर्धा शहर बनले.वर्धा जिल्हया मध्ये तीन डिविजन असुन आठ तालुके आहेत

वर्धा जिल्हा हा महाराष्ट्राच्या दक्षिण पूर्वेस व वर्धा वैनगंगा नदीच्या पश्चिम खोरयात स्थित आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडे सातपुडा पर्वत रंग असून पश्चिम भाग हा पूर्ण नदीच्या खोरयात व्याप्त आहे. नागपूर जिल्हा उत्तरेकडे असून वर्धा नदी उत्तर, दक्षिण आणि पश्चिम सीमेवरून वाहते.

राजकीय महत्ता

1934 मध्ये महात्मा गांधी वर्धेला आले होते.त्यांनी त्यांच्या कामकाजारिता सेगाव येथील जमुनालाल बजाजची जागा निवडली .तीच आता सेवाग्राम या नावाने ओळखल्या जाते. त्यानंतर वर्धा जिल्हाला अनंन्यसाधारण महत्व आले. भारतातच नवे तर विश्वात सुधा त्याच्या स्वतंत्र्याच्या चळवळी मध्ये सेवाग्राम आणि वर्धा अजरामर होवून गेला. गांधीजी च्या निर्देशा नुसार आचार्य विनोबा भावे यांनी त्यांच्या मागोमाग पौणार येथे धाम नदीच्या तीरावर ,वर्धा -नागपूर महामार्गावर आश्रम स्थापित केले

वर्धा जवळील गोपुरी गावात बराच काळ आचार्य विनोबा भावे यांचे वास्तव्य राहिले . आज जिथे गीताई मंदिर चे निर्माण झाले आहे तिथेच स्वर्गीय जामुनालालजी बजाज एका छोट्याश्या झोपडीत राहत होते.

राष्ट्राध्यक्ष राजेंद्र प्रसाद, मौलाना अब्दुल कलाम आझाद, पं. जवाहरलाल नेहरू, आचार्य कृपलानी, लाल बहादूर शास्त्री, सावरकर, सुभाषचंद्र बोस, खान अब्दुल गफ्फार खान, नारायंजी अग्रवाल, राजश्री टंडन, डॉ राधाकृष्णन, इंदिरा गांधी, आचार्य अर्यनायाकम, डॉ जे सी कुमारप्पा, कामराज, आचार्य धर्माधिकारी, कवी केशवसुत, वीर राम मनोहर लोहिया, सरोजिनी नायडू इत्यादी महान नेते वर्ध्याच्या राजकीय, सामाजिक तसेच शैक्षणिक महत्वामुळे वर्ध्याला भेट देऊन गेले.

भारतीय स्वातंत्र्य चळवळ संबंधित विविध महत्त्वपूर्ण निर्णय सेवाग्राम आश्रमात घेतले गेल. त्यामुळे वर्धा हि भारताची गैर सरकारी राजधानी होती. विविध देशातील शिष्टमंडले आणि राजकीय, सामाजिक, धार्मिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी गांधीजीना भेटले.

स्वातंत्र्यलढ्यात सहभाग

वर्ष 1934 पासून महात्मा गांधी वर्धा मध्ये राहले होते, भारताच्या भविष्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय त्या वातावरणात काढण्यात आले आहेत. गांधीजीनी त्यांचा वैयक्तिक 'सत्याग्रह' 1940 मध्ये आश्रमातून सुरू केला. विनोबा भावे हे चळवळीतील पहिले भारतीय सत्याग्रही होते.

१९४० मध्ये श्रीमती सर्युती धोत्रे यांनी वर्धा स्टेशन येथे स्वातंत्र्य सैनिकांना संबोधित केले व लगेच त्यांना व इतर स्वातंत्र्य सैनिकांना अटक करण्यात आली. त्यानंतर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात श्री जंगलुजी ढाले आणि चीन्नाबाई जे गांधी चौकात तिरंगा ध्वज फडकाविण्यास गेले होते ते यात शहीद झाले. या घटनेनंतर ब्रिटीश पोलिसांनी लोकांवर शिक्षा म्हणून अधिक कर वसूल केले.

१६ ऑगस्ट क्रांती

१६ ऑगस्ट १०४२ रोजी नागपंचमीच्या दिवशी हि क्रांती आष्टी तालुक्यातील सर्व गावांमधून सुरु झाली. 'पत्थर सारे बोंब बनेंगे, भक्त बनेगी सेना' अशी घोषणा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिली. या दिवशी आष्टी येथे ब्रिटीशांनीगोळीबार केला ज्यात ६ स्वतंत्र सेनानी शहीद झाले व ४ गंभीर जखमी झाले. ११२ जणांना तुरंगात डांबण्यात आले.

म्हणून १६ ऑगस्ट हा दिन हुतात्मा दिन म्हणून आष्टी येथे पाळला जातो. वर्धा जिल्ह्यातील आष्टी, पेठ, अमडापूर, वडाला, खडकी, साहूर, आर्वी, वर्धा, सेवाग्राम येथे हुतमता स्मारक आहेत.

वर्धा जिल्हाची संस्कृती

विदर्भामध्ये ,वर्धा जिल्हात नेहमी कलेला , पारंपारिक ,संस्कुतिक ,सामाजिक,साहित्यिक क्षेत्राना प्रोसहान देण्यात येते.हि भूमी प्रसिद्ध कलाकार,तत्त्वज्ञानी लोकांची उपज आहे.हि भूमी गांधीजी च्या सत्याग्रही विचाराची आहे .हि भूमी विनोभाजी च्या भूदान आंदोलनाच्या पद्चीन्हाची साक्षी आहे.

सुप्रसिद्ध निर्माता-निर्देशक राजदत्त ,संजय सुरकर,मूर्तिकार ,आणी चित्रकार बी विठल,हरिःअर पांडे, टी.जी. पाटणकर,प्रसिध्द लेखक वामनराव चोरघडे,वराडी शब्द्कोशानिर्माता प्रा.देविदास सोटे ,संगीतकार डॉ.प्रकाश संगीत ,कामालाभाई भांडे , बासरीवादक नरेंद्र शाह, इत्यादी लोकांनी वर्धा जिल्हा मधूनच आपल्या कामाला सुरुवात केली होती. प्रा. शाम मानव यांनी अंधश्रद्धा निर्मुलना चे काम वर्धा जिल्हामधून सुरुवात केली,आणि आता त्याचे रूप स्वपूर्ण भारतभर दिसत आहे.

थियेटर आणि नाटक

वर्धा जिल्हामधील संस्कृती कलेला,पारंपारिक संस्कृती ला जोपासण्याचे आणि त्यांना अविरत जिवंत ठेवण्याचे श्रेय थियेटर आणि नाटकाला जातो.प्रसिद्ध थियेटर कलाकार स्वर्गीय एम. डी. देशमुख ,पुरुषोत्तम दारवेकर,दिनकरराव देशपांडे आणि इतत्यादि लोकांनी आपले अमोल्य असे योगदान देवून थियेटरचा वर्धा जिल्हामध्ये पाया रचला आणि श्री.एम.डी.देशमुख यानी तो अविरत चालत राहावा या करिता जीवन भर कार्यरत राहिले.

साहित्य आणि तत्वज्ञान

महात्मा गांधी ,आचर्य विनोभा भावे,काका कालेलकर ,आचार्य दादा धर्मादिकारी ,कुंदर दिवाण ,निर्मला देशपांडे इत्यादी वरिष्ट लेखकांनी स्वताचे तत्वज्ञान आणि जिवंत रसपूर्ण साहित्य मराठी आणि हिन्दी भाषेमध्ये मांडले.डॉ.श्रीमान नारायण अग्रवाल ,श्री क्रीशनदासजी जाजू ,माडसा नारायन,ठाकूरदासजी बंग ,नारायणदास जाजू,भंते आनंद,कौशाल्यायन,उमाशंकरशुक्ला ,आसाराम वर्मा ,डॉ.सुरेंद्र बिरलींगे, पद्माकर चितळे ,मनोहर वरारपांडे,डॉ.सदाशिव डांगे, दामोदरदास मुंदडा ,डॉ. एम.जी.मोर्के इत्यादी.लेखकांनी रस युक्त साहित्य मराठी आणि हिंदी तासेच इंग्रजी मध्ये पसिद्ध केले.विनोभा भावे यांचे "गीताई"हे मराठी साहित्य फार प्रसिद्ध आहे.

संगीत

सुप्रसिद्ध पेटीवादक बाबूजी भट्ट हे आर्वीचे होते.रासुलाबाद्चे बापूराव रापते मनोहरराव देवूलकर हे प्रसिद्ध तबलावादक होते .वर्धा येतील महिलाश्रम संस्थामधील शिक्षक जे.एल.रानडे हे प्रसिद्ध गायक होते. १९४१ मध्ये रामदास शास्त्री ,भास्करराव संगीत यानी "शिवानंद संगीत शाळा " सुरु केली.

प्रहार

हि एक संस्था आहे जी शाळा ,महाविद्यालये मधील तरुण विद्यार्थ्यांमध्ये प्रकृती बद्दल ,निसर्गाबद्दल प्रामाणिकपणा ,सैनिकी मानसिकता,देशभक्ती या सारखे गुण निर्माण करण्या करिता मदत करते.ले.कर्नल सुनील देशपांडे यांनी नागपूर येथे प्रहार महासंघाची सपना केली होती,आणि प्रा. मोहन गुजर यानी प्रहारची उपशाका वर्धा येते स्थापन केली.प्रहार हि फक्त तरुण विध्यार्थी वृन्दांमध्ये सैनिकी मानसिकता निर्माण करते त्याचबरोबर प्रशिक्षन शिबिरांचे सुध्दा आयोजन करते.आणि त्या प्रसिक्षनामध्ये राष्ट्रीय अखंडता ,मौलीकधिकार,आदर्श नागरिकता ,शहरी सुरक्षितता ,देखरेख ,घोडेस्वारी,जंगल भटकंती ,पर्वतारोहण, इत्यादीचे प्रशिक्षन दिल्या जाते.तसेच मौलिक अधिकार ,आदर्श नागरिकता ,राष्ट्रीय अखंडता,धर्मानिर्पेक्षता,उन्न्हाळीकथा ,थोर नेथांची गाथा,सामान्,निबंद प्रतियोगिता ,समूह चर्चा ,नेतृत्व,स्पुर्तीदायक गायन,आणि बरेच काही महत्वाची चर्चा ,या बद्दल चे घडण प्रहार मध्ये केले जाते

सहकार चळवळ

सावकारापासून शेतकऱ्याला मुक्तता मिळून देण्याकरिता सहकारी चढवळी ची स्थापना करण्यात आली.किंवा असेही मानता येयील की सहकार चढवळीमुळे शेतकरी वर्ग सावकार पासून मुक्त झाला.सहकार चढवळ शेतकऱ्याला त्याच्यायाचा मालाची उत्पादकता वाढविण्याला आणि भौतिक विकास करण्याला मदत करते. जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यानंतर २६ जानेवारी १९६२ मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी अधिनियम १९६० लागू केला आणि त्यावर अंमल सुद्धा केला .आणि ह्या कायद्याला नागरिकाकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला .राज्य सरकारने सहकारी क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती आणि 'लवाद' ची स्थापणा केली .त्यामुळे खाजगी क्षेत्राच्या समस्या सोडविण्याकरिता रामबाण इलाज मिळाला त्यामुळे सहकारी चळवळीला स्वतः उभे राहण्याकरिता चांगले समर्थन मिळाले.

वर्धा जिल्हा मध्ये सध्या १५३४ वगवेगळ्या सहकारी संघटना कार्यरत आहे.जिल्हा सहकारी बँक, आणी जिल्हा सहकारी भू विकास बँकमुळे शेतकऱ्यांना नवी दिशा मिळाली आणि शेतकऱ्यांना परिपूर्ण वित्तीय मदत मिळण्याकरिता सुविधा झाली.स्वर्गीय बापूराव देशमुख यांचा सहकारी चळवळी मध्ये महत्वाचा वाटा आहे.