लोकसंख्या व साक्षरता

2001 च्या मोजणी नुसार, वर्धा जिल्ह्याची लोकसंख्या 12,36,736 आहे. पुरुष संख्या 638990 आहे आणि महिला लोकसंख्या 597776 आहे. १९९१ ते २००१या कालावधीत जिल्ह्याची लोकसंख्या 10 वर्षांत 15,87 टक्के वाढली. एकूण लोकसंख्येच्या 20.40 टक्के लोकसंख्या शहरी क्षेत्रात आहे आणि 73.60 ग्रामीण क्षेत्रात आहे. शहरी शहरी आणि ग्रामीण भागातील लोकसंख्या अनुक्रमे 3,25,041 व 9,11,695 आहे.

लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर 196 व्यक्ती आहे. पुरुष आणि महिला लोकसंख्या प्रमाण 1000 पुरुषांसाठी 935 महिला आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण 937 आहे आणि शहरी भागात 930 आहे.

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती लोकसंख्या अनुक्रमे 1,58,630 आणि 1,54,415 आहे. पण एकूण लोकसंख्येच्या अनुसूचित जाती आणि जमाती अनुक्रमे 12,83% आणि 12,49% आहे.

2001 च्या मोजणी नुसार जिल्ह्यातील एकूण साक्षर संख्या 8,65,556 आहे. पुरुष साक्षरता 4,86,736 आहे आणि महिला साक्षरता 3,78,820 आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या 80,06% साक्षरता आहे.