भौगोलिक स्थान

वर्धा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या उत्तर पूर्व बाजूस स्थीत आहे. 1862 पर्यंत जिल्हा नागपूर जिल्ह्यातील भाग होता; कालांतराने तो एक स्वतंत्र जिल्हा करण्यात आला.

Wardha district lies between 20o18’ North and 21o21’ North latitudes and 78o4’ East to 79o15’ east longitudes.

वर्धा जिल्ह्याच्या पश्चिम आणि उत्तर कडे अमरावती जिल्ह्या आहे तर दक्षिणेकडे यवतमाळ जिल्हा आहे, दक्षिण पूर्वेकडे चंद्रपूर जिल्हा असून पूर्वेकडे नागपूर जिल्हा आहे. अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यासोबतच्या सीमारेषा वर्धा नदी ठरवते.

क्षेत्र आणि प्रशासकीय विभाग

वर्धा जिल्ह्या नागपूर महसूल विभागातील एक भाग आहे. भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर इत्यादी जिल्हे नागपूर महसूल विभागात समाविष्ट आहे.

जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्राच्या 2% आहे जे 6309 चौ किमी, क्षेत्र समाविष्टीत आहे.

प्रशासकीय सोयीसाठी वर्धा जिल्हा तीन उप विभागात विभाजीत पोट केले गेले. प्रत्येक उपविभागात २ ते ३ तहसील आहेत.

उप विभागाचे नावसमाविष्ट तहसील
वर्धावर्धा, सेलु, देवळी
हिंगणघाटहिंगणघाट, समुद्रपूर
आर्वीआर्वी, आष्टी, कारंजा