मुख्यपृष्ठ

आज स्पर्धेच्या युगात ग्रामीण तसेच गरिब विद्यार्थ्यां मध्येक गुणवत्ताज असुन स्पिर्धा परिक्षेसंबंधी चांगले मार्गदर्शन मिळत नाही. यामुळे ग्रामीण भागातील बेरोजगार विद्यार्थी प्रशासनिक सेवेकडे वळण्यास धजावत नाहीत. प्रशासनाने सुरु केलेल्या् स्प र्धा परिक्षा मार्गदर्शन शिबिरामुळे आम्हा सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत आहे. अशीच शिबिरे नियमित केल्या्स प्रशासनाचे आम्हीा आभारी राहू असे मत आयोजित प्रशासनासोबत एक दिवस घालविण्याेसाठी निवड करण्यात आलेल्या गटातील विद्यार्थ्यांतनी व्यक्त केले. जिल्हयातील सुशिक्षित तरुणांना प्रशासनिक सेवेत संधी मिळावी व त्यांची आर्थिक उन्नती व्हा‍वी यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विद्यार्थ्यां साठी स्पर्धा परिक्षेची पूर्व तयारी करण्या्साठी महिन्या्च्या पहिल्या शनिवारी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्याात येते आहे. 3 सप्टेंबर रोजी झालेल्या स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबिरातून समितीने प्रज्वल पिंपळे, आशिष ढगे, प्रविण चन्ने., प्रियंका गव्हा ले, शिवानी मुन व प्राजक्ता म्हैिसकर या गटाची एक दिवस प्रशासनासोबत राहण्यासाठी निवड केली. या गटांनी 17 सप्टें बर रोजी संपूर्ण दिवस विविध विभागाच्या प्रशासनिक कामाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी विद्यार्थ्यांचा परिचय करुन मार्गदर्शन केले. निवासी उपजिल्हााधिकारी मंगेश जोशी यांनी आपत्ती व्यथवस्था्पन, महसूल, सामान्यच नागरिक यांच्याा समस्या कशा हाताळाव्या लागतात याबाबत विर्द्यार्थ्या्ना मार्गदर्शन केले. उपविभागीय पोलीस अधिकारी माधव कडीले यांनी सामान्य् जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न कसा हाताळवा लागतो यावि‍षयी सखोल मार्गदर्शन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांनी जिल्हा परिषदे मार्फत चालविण्याित येणा-या प्रशासनिक कामाबातत मार्गदर्शन केले. उपमुख्यन कार्यकारी अधिकारी विवेक इलमे यांनी ग्रामीण भागातील नागरिकांच्या- समस्याक बाबत विद्यार्थ्यांपना मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा परिषदेचे वित्ते लेखाधिकारी सदाशिव शेळके यांनी जिल्हा परिषदे अंतर्गत आर्थिक व्यंवहाराविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणुन प्रतापराज मासाळ कामकाजाची जबाबदारी पार पाडली. या स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन वर्गाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांनी केले आहे.