नद्या

rivimg.jpg (16001 bytes)जिल्ह्याचा संपूर्ण भाग वर्धा-वेनगंगा घाटामध्ये स्थित आहे. सर्व नदयाचा उगम उत्तरेकडील विभिन्न पर्वतशिखरे आणि सातपुडा पर्वताच्याश्रेणीमधून होतो.वर्धा व वेणा नदीला सोडले तर बाकी सर्व नदया अस्थायी प्रकारच्या आहेत.

In Deoli, Wardha, Seloo, Hinganghat and Samudrapur Tahasil the Drainage pattern is of Dendritic type. Where as in Karanja, Ashti, Arvi Tahasil it is of Parallel or sub-parallel type. This is due to the controlling of Joint-planes in Besalt on the flow routes of northern side rivers. Therefore various northern side rivers flows parallel to the main river in North-South direction.

वर्धा नदी- वर्धा नदीचा उगम ७८५ मीटर उंच मुल्ताई च्या पठारावरून सातपुडा पर्वतातून झाला आहे.ही नदी दक्षिण वाहिनी आहे.वर्धा जिल्ह्याचा उत्तरं,दक्षिण आणि पश्चिम सीमारेषेवरून वाहत वर्धा नदी चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश करते.धनोडी या वर्धा जिल्ह्याच्या एका खेड्यात लोवर वर्धा प्रकल्प आहे.

वेणा-वर्धा नदीची उपनदी आहे. ही नदी काही अंतर वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर काही वाहून परत सावंगा येथे वर्धा नदीला मिळते. for ही नदी जिल्ह्याच्या उत्तर पश्चिमेस ३ कि.मी. अंतरावरून वर्धा जिल्ह्यात शिरते.

पोथरा- पोथ्रा नदीचा उगम ३९० मीटर उंचावरून गिरड च्या पर्वतातून झाला आहे. या नदीवर १९८२ मध्ये समुद्रपूर तालुक्यातील झुनका गावाजवळ एक बंधारा बांधण्यात आला.

बोर-हिचा उगम नागपूर जिल्ह्यातून आहे.हि नदी २२० मीटर उंचीवर सावंगी जवळ धाम नदीला मिळते.१९६९ मध्ये एक बंधारा वर्धा जिल्ह्यातील बोर नदीवर बांधण्यात आला होता.

धाम-: धाम हि उपनदी असून हिचा उगम ब्रामनावाडा पर्वतातून ढगा वनक्षेत्र या ठिकाणी ४६५ मीटर उंचीवर झाला आहे.हि नदी वेगवेगळ्या दिशेला वाहते.

पंचधारा- ही धाम नदीची उपनदी असून मांडली वन परिक्षेत्रात ५९९ मीटर उंचीवरून वाहते.

यशोदा– यशोदा हि वर्धा नदीची उपनदी आहे.हिचा उगम ३५७ मीटर उंचीवर सातपुडा पर्वतातून झाला आहे. उत्तर पश्चिमेकडून हिंगणघाट तहसीलच्या अलीपूरला हि नदी येते. नंतर दक्षिणेस वळून हि वर्धा नदीला टेकली या गावात मिळते.

बाकली– हिचा उगम आष्टी तालुक्यात ३६५ मीटर उंचीवरून सतर्पूर वन परिक्षेत्रात झाला आहे.हि नदी नंतर पारगोठान रेल्वे स्टेशन च्या पश्चिमेस वर्धा नदीला मिळते.

कार– कार नदीचा उगम कोंढाळी उत्तर पूर्वेस ६५० मीटर उंचीवर झाला आहे. नंतर हि वर्धा नदीला जावून मिळते.