मुख्यपृष्ठ

बापू कुटी, सेवाग्राम

Click to enlarge सन 1940 साली गांधीजींनी सेगाव या गावाचे नामकरण सेवाग्राम केले. महात्मास गांधीच्या पदस्पर्श आणि वास्तव्याने पुनीत झालेले क्षेत्र म्हणजे सेवाग्राम. वयाच्या 67 व्या वर्षी म्ह्णजेच 30 एप्रिल 1936 च्या पहाटे महात्मा गांधी वर्ध्या पासून आठ किलोमीटर अंतरावरील सध्याच्या सेवाग्राम या ठिकाणी पोचले. पाच ते सहा दिवस ते याठिकाणी राहिले. येथील ग्रामस्थांना त्यांनी त्यांच्या येण्यामागील उद्देश सांगितला. तसेच भूमिका विषद केली. त्या्नंतर हळूहळू सेवाग्राम आश्रम भारताच्या स्वातंत्र्य संग्राम चळवळीचे केंद्र बनले. सेवाग्रामचे पूर्वीचे नाव सेगाव होते. हे गाव पूर्ण जंगलाने वेढलेले होते. ना पोस्ट ऑफिस ना टेलिग्राफ ऑफिस. केवळ सेवाग्राम गावाकडे येण्यासाठी एक पादचारी आणि बैलगाडीचा रस्ता होता.

आश्रमातील कुटी

Click to enlargeसेवाग्राम येथे गांधीजी येण्यापूर्वीच मीरा बेन येथे वास्तंव्यास होत्याह. सेवाग्रामकडे येण्यासाठी त्याकाळात पक्का रस्ताही नव्हाता. परंतु जेव्हा गांधीजी सेवाग्राम येथे आले तेव्हा तत्काळ येथे एक बगल रस्ता तयार करण्यावत आला. गांधीजींनी त्यांच्या वास्तयव्यासाठी उभारण्यातत येणा-या कुटीकरीता 500 रुपयांहून अधिक खर्च लागणार नाही ही अट घालून कुटी उभारण्याएसाठी परवानगी दिली. या कुटीलाच आदि निवास म्हणून ओळखले जाते. या कुटीमध्ये महात्मा गांधीजी, कस्तुरबा गांधी, सरहद्द गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राहायचे. याच कुटीतून पुढे महात्मा गांधी बापू कुटीत राहायला गेले.

‘बापू’ कुटी आणि ‘बा’ कुटी

Click to enlargeआदि निवासात गावक-यांची संख्या. दिवसेंदिवस अधिक वाढल्याने गांधीजींच्या अनुयायी मीरा बेन यांनी त्यांच्या कुटीच्या पूर्वेला अजून एक नवीन कुटीची निर्मिती केली. ही कुटीही गांधीजींच्या कार्यालयाकरीता देऊन त्यांनी गावाजवळच स्थलांतर केले. या कुटीलाच आज बापू कुटी आणि बापू ऑफिस असे संबोधले जाते.Click to enlargeगांधीजींना भेटायला बहुसंख्येने अनुयायी येत असत. याच कुटीत कस्तुरबाही राहत. त्यामुळे कस्तु रबांजींची अडचण लक्षात घेऊन बापूजींनी बाजूलाच कस्तुजरबाजींसाठी कुटी उभारली. महिलांसाठी निवासस्थानाची सोय यामुळे झाली. या कुटीलाच ‘बा’ कुटी म्हसणून ओळखले जाते. जेव्हा आपण या कुटीकडे पाहतो तेव्हा गाधींजींचे साधे राहणीमान आपल्या् डोळयासमोर उभे राहते.

कुटीला बांबू, तट्टयांचे आच्छादन आहे. भिंती पांढ-या मातीने सारवलेल्या. आहेत. मीरा बेन यांनी कुटीच्यार भिंतीवर ओम, बांबूंचे वृक्ष, मोर, चरखा, निसर्गाची चित्रे रेखाटली होती. ती आजही कायम आहेत. खिडक्याम, दरवाजे बांबूनींच बनवून स्थानिक पद्धतीने सजविण्यात आलेले आहेत. ग्रामस्थांनी बनविलेल्या तट्टयांचा वापर कुटीच्या आच्छादनासाठी करण्यात आलेला आहे. सिंदीच्या‍ झाडापासून तयार करण्या‍त आलेल्या चटयांचा वापर गांधीजी करत असत.

Click to enlargeबापूंच्या कार्यालयीन कुटीमध्येंच आपणाला तत्कालीन दूरध्व नीही पाहावयास मिळतो. गांधीजी वापरत असलेले सुंदर पेपर वेटही याठिकाणी पाहावयास मिळतात. तसेच चिनीमातीतील तीन माकडे सर्वांचे आकर्षण ठरते.प्रार्थना स्थळ

Click to enlarge सेवाग्राम आश्रमात सकाळ आणि सायंकाळ आजही प्रार्थना होते. महात्मा गांधीजींनी निर्माण केलेले हे प्रार्थनास्थपळ खुल्या ठिकाणी आहे. गांधीजी या ठिकाणी प्रार्थनेनंतर आश्रमातील, देशातील समस्या तसेच विविध विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन करून उपस्थितांच्या शंकांचे निरसन करत.परचुरे कुटी

Click to enlargeबापूकुटी आणि कार्यालयीन कुटीच्या पूर्वेला परचुरे कुटी आहे. परचुरे हे सामाजिक कार्यकर्ते आणि संस्कृ्तचे गाढे अभ्यापसक होते. तत्काळात कुष्ठिरोगामुळे नागरिक त्रस्त होते. परचुरेही या रोगामुळे बाधित झाले. त्यांमनी आत्महत्या करण्या्चा विचार मनात आणला होता. तत्पूर्वी त्यांनी गांधीजींची भेट घेतली. त्यायनंतर गांधीजींनी या रोगावर उपचारासाठी नर्सिंग आणि स्वच्छतेवर भर दिला. तसेच बाधित परचुरेंची याच कुटीत सेवा केली.

मनोहरजी दिवान यांनी तर अशा रोगींसाठी गांधीजींच्या सूचनेवर पूर्ण आयुष्य व्यतित केले. त्यांसनी कुष्ठुरोग्यांसाठी सेवाग्राम, दत्तपपूर येथे रुग्णांची सेवा करण्यासाठी संस्था उभारली. परचुरेंनाही याठिकाणी हलविण्यात आले. परचुरेंची मृत्यूपर्यंत याचठिकाणी सेवा करण्याचत आली.

महादेव कुटी

Click to enlarge धार्मिक वृत्ताचे, गुजराती आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्वी असलेले महादेवभाई देसाई. गांधीजींचे सचिव आणि अत्यंत जवळचे. ते त्यांच्या कुटुंबासह बापू कुटी जवळ राहत. त्यांच्या कुटीला महादेव कुटी म्‍हणून ओळखल्या‍ जाते. पुण्याहतील आगाखान पॅलेस तुरुंगात जेव्हा गांधीजी होते त्योलवळी 15 ऑगस्टा 1942 ला महादेवभाई देसाई यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याोने महात्मा गांधींना अति दुःख झाले होते.

किशोर कुटी

गांधी विचारांचे अभ्यासक, काही काळ, गांधीजींचे सचिव असलेले किशोरभाई मश्रूवाला यांना दम्याचा त्रास होता. म्हणून त्यांना पावसाळयात अधिक त्रास होऊ नये याचा विचार करुन बापू कुटीच्या इशान्य दिशेला कुटी उभारण्यालत आली. या कुटीलाच किशोर कुटी म्हणून ओळखल्या जाते.

सरहद्द गांधी

आजारी रुग्णांची सेवा त्याचबरोबर इतर कर्तव्येही चोखपणे पार पाडणारे. गांधीजींनी ज्यांना वर्ध्यात येण्याचे निमंत्रण दिले होते असे अत्यंत साधी राहणी असणारे अब्दूंल गफार खान. आदि निवासात राहणा-या व्यक्तीला मांसाहार करण्याची गांधीजींनी परवानगी दिली होती. परंतु त्यांनी मांसाहार केला नाही. आश्रमाच्याद शिस्तीचे कठोरपणे पालन करत असत. ते स्वातःला भगवंताचा सेवक मानत असत.

संत तुकडोजी महाराज

महात्मां गांधीजींसोबत एक महिना आदि निवासात वास्ताव्यानस राहिलेले संत तुकडोजी महाराज. त्यांची प्रेरक प्रार्थना असंख्यर ग्रामस्थं ऐकायला येत असत. सेवाग्राम आश्रमातून परतल्या नंतर संत तुकडोजी महाराजांनी महात्मास गांधीजींच्या् विचारांशी जुळणारा ग्रामोदयी आकृतीबंध त्यांच्या आश्रमात सुरु केला. सकाळ, सायंकाळ दररोज ते याठिकाणी प्रार्थना करत.

आश्रमासाठी अधिष्ठानरूप एकादशव्रत

सर्वोदयाचे सिद्धांत

 1. सर्वांच्‍या कल्‍याणात आपले कल्‍याण आहे.
 2. सर्वांना आपल्‍या कामातून आपली रोजीरोटी कमावण्‍याचा समान हक्‍क.
 3. श्रमयुक्‍त जीवन म्‍हणजे एक शेतकरी किंवा हस्‍तोद्योग करणारा यांचे जीवन हेच खरे जीवन आहे.

बापूजींचा दैनंदिन दिनक्रम

बापूंचे वास्तव्य

महात्मा गांधींचे सेवाग्राम आणि वर्ध्यामध्ये 2 हजार 588 दिवस वास्तव्य, होते.

सद्यस्थितीत आश्रमातील दिनचर्या

4.30 वाजता – झोपेतून उठणे
4.45 – सकाळची प्रार्थना
5.15 ते 6.30 – अभ्यास
6.30 ते 8.00 – स्वयच्छ्ता, स्वंयंपाकात मदत
7.30 ते 8.00 – न्याहारी
8.00 ते 10.30 – स्वेयंपाक, शेतीची कामे आदी.
11.00 ते 12 – भोजन, स्वाच्छता काम
12.00 ते 2.00 – बापु कुटीमध्ये विश्रांती
2.00 ते 2.30 – सामुदायिक विणकाम
3.00 ते 5.00 – अभ्यास आणि इतर कामे
5.00 ते 5.30 – सायंकाळचे भोजन
6.00 ते 6.30 – सायंकाळची प्रार्थना
6.30 ते 9.00 – स्वच-अभ्या0स
9.00 – झोपने

यात्री निवास आणि गांधी चित्र प्रदर्शनी

सेवाग्राम आश्रमाच्या‍ पश्चिमेला मुख्ये रस्याा वर गांधीजींच्याा जीवनावर आधारीत गांधी चित्र प्रदर्शनी आहे. तसेच यात्री निवासातही पर्यटकांसाठी प्रदर्शन भरविण्यारत आलेले असते.

सेवाग्रामशी संबंधित इतर संस्‍था

 1. गांधी सेवा संघ, सेवाग्राम
 2. सर्वसेवा संघ, महादेवभाई भवन, सेवाग्राम
 3. नई तालीम समिती, आश्रम, सेवाग्राम
 4. ब्रह्म विद्यामंदिर, पवनार, वर्धा
 5. महारोगी सेवा समिती, दत्‍तपूर, वर्धा
 6. ग्रामसेवा मंडळ, गोपुरी, वर्धा
 7. मगनसंग्रहालय, वर्धा
 8. अखिल भारतीय कृषी गोसेवा संघ, गोपुरी, वर्धा
 9. आचार्यकुल, गोपुरी, वर्धा
 10. खादी मिशन, गोपुरी, वर्धा
 11. शिक्षा मंडळ, वर्धा
 12. महिला आश्रम, वर्धा
 13. गांधी ज्ञान मंदिर, वर्धा
 14. श्री लक्ष्‍मीनारायण देवस्‍थान वर्धा
 15. गोरस भंडार, मगनवाडी, वर्धा
 16. राष्‍ट्रभाषा प्रचार समिती, वर्धा
 17. लेप्रसी फाऊंडेशन, वर्धा
 18. महात्‍मा गांधी  ग्रामोद्योग संशोधन संस्‍था (एमगिरी)